• कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स. ९.४५ वा ते संध्या ६.१५ वा.
  • संपर्क: कुंब्रल

  • LOGIN
  • Register

निसर्ग आणि वन्यजीव

हे पेज शेअर करा:

पर्यटनाच्या वाटेवरती...

महाराष्ट्र हे निसर्गसौंदर्याने समृद्ध राज्य आहे. पर्यटन करताना धाडसी अनुभव घेण्यास तुम्ही उत्सुक असलात तर तुमच्यासाठी राज्यात अनेक आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवताना तुम्ही वन्यजीवांचे दर्शनही घेऊ शकता. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळातर्फे अशा विविध ठिकाणी पर्यटकांसाठी निवासाची आणि भोजनाची उत्तम सोय करण्यात आली आहे. मार्गदर्शकांच्या सोबतीने तुम्ही या ठिकाणी भटकंती करू शकता, जलविहार करू शकता आणि साहसी खेळांमध्येही सहभागी होऊ शकता.

भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य
Image of Bhimashankar Wildlife Sanctuary
भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य

पुणे शहरापासून १३८ किमी अंतरावर असलेले भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य जैवविविधतेने समृद्ध आहे. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी भीमाशंकरच्या जंगलात हमखास आढळतो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे भीमाशंकर मंदिर सुद्धा या अभयारण्यात आहे.

कास पठार
Image of Kaas Plateau Reserved Forest
कास पठार

रंगीबेरंगी फुले आणि वनसंपदेने समृद्ध असलेल्या कास पठारावर फुलांच्या तब्बल ८५० आणि दुर्मिळ प्रकारातील ३३ प्रजाती आढळतात. युनेस्कोने २०१२ साली हे ठिकाण जागतिक नैसर्गिक वारसा म्हणून घोषित केले आहे.

बोर व्याघ्र प्रकल्प
Image of Bor Tiger Reserve
बोर व्याघ्र प्रकल्प

महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात हिंगणी येथे हा बोर व्याघ्र प्रकल्प आहे. पूर्वी हे वन्यजीव अभयारण्य होते. भारतातील वाघांचे संवर्धन करण्यासाठी २०१४ साली त्याचे व्याघ्र प्रकल्पात रूपांतर करण्यात आले.

कोयना वन्यजीव अभयारण्य
Image of Koyna Wildlife Sanctuary
कोयना वन्यजीव अभयारण्य

सातारा जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या मधोमध वसलेले कोयना वन्यजीव अभयारण्य हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. या अभयारण्यात वाघाबरोबरच भारतीय गवा, सांबर, किंग कोब्रा आणि मोठी खार असे वन्यजीव आढळतात.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
Image of Tadoba-Andhari Tiger Reserve
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

चंद्रपूर जिल्ह्यातल्या या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बिबट्या आणि वाघासह अनेक वन्यजीव पाहता येतील. गवताळ प्रदेश आणि अनेक जलसाठे असलेले ताडोबा-अंधारी हे राज्यातील पक्ष्यांसाठी राखीव क्षेत्रांपैकी एक आहे.

कर्नाळा पक्षी अभयारण्य
Image of Karnala Bird Sanctuary
कर्नाळा पक्षी अभयारण्य

पक्षी प्रेमींसाठी नंदनवन म्हणून ओळखले जाणारे कर्नाळा अभयारण्य पनवेलपासून २०० कि.मी. अंतरावर आहे. २०० पेक्षा जास्त सुंदर पक्षी या ठिकाणी बघता येतील.

नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्प
Image of Nawegaon-Nagriza tiger reserve
नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्प

नवेगाव नागझिरा हा राज्यातील अनेक व्याघ्र प्रकल्पांपैकी एक असून भारतात आढळणार्‍या जवळजवळ सर्व मुख्य वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजाती इथे आढळतात.

ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य
Image of Thane Creek Flamingo Sanctuary
ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य

ठाण्याच्या खाडीतील पाण्यात फ्लेमिंगो पाहण्यासाठी तुम्ही बोटीतून फेरफटका मारू शकता. या ठिकाणी पक्ष्यांच्या १६० पेक्षा जास्त प्रजाती तुम्ही पाहू शकता.

गौताळा वन्यजीव अभयारण्य
Image of Gautala Wildlife Sanctuary
गौताळा वन्यजीव अभयारण्य

औरंगाबादहून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर, पश्चिम घाटाच्या सातमाळा आणि अजिंठा डोंगररांगेत गौताळा वन्यजीव अभयारण्य आहे. या अभयारण्यात २३० पेक्षा जास्त पक्षी आणि प्राणी प्रजाती आहेत.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
Image of Sahyadri Tiger Reserve
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

एकूण ११६६ किमी इतक्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या या प्रकल्पात कोयना वन्यजीव अभयारण्य, चांदोली नॅशनल पार्क आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो. इथे बिबट्या, मोठी खार, कबुतर, सुतारपक्षी आणि हरीण असे प्राणी बघता येतील.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प
Image of Melghat Tiger Reserve
मेळघाट व्याघ्र प्रकल्प

मेळघाट हा महाराष्ट्रातील पहिला अधिकृत व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो. वाघाबरोबरच परदेशी प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजातींसह दुर्मिळ अशी जंगली घुबडेही या परिसरात बघता येतील.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
Image of Sanjay Gandhi National Park
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

मुंबईतले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे राज्यातील सर्वात मोठ्या संरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे. या राष्ट्रीय उद्यानात ७४ प्रकारचे पक्षी, फुलपाखराच्या १७० प्रजाती आणि ३५ प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात.

उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य
Image of Umred Karhandla Wildlife Sanctuary
उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य

उमरेड करंडला वन्यजीव अभयारण्य हे ताडोबा-अंधारी, बोर, पेंच, नवेगाव-नागझिरा आणि उमरेड करंडला प्रकल्पांना जोडते. पक्षांच्या या नंदनवनात पक्ष्यांच्या तब्बल १८० प्रजाती आढळून येतात, यातील १० स्थलांतरित तर ७ अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहेत.

स्वामित्व हक्क © , www.yuvaface.com 

Go To Top