सांगेली,ता.सावंतवाडी,जिल्हा-सिंधुदुर्ग
शरद पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जाणता लोकनेता, द्रष्टा, संकटमोचक ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे.याशिवाय महाराष्ट्र आणि देशाच्या साहित्य, संस्कृती, संगीत व कलेची उत्तम जाण असलेले एक मर्मज्ञ रसिक व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार!
जाणता लोकनेता भारताच्या राजकीय क्षेत्रातील एक अत्यंत कर्तबगार, कणखर व कुशल नेतृत्व! तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ओळखणारा, जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण असलेला दूरदर्शी, पारदर्शी आणि सामान्यांना आपला वाटणारा जाणता लोकनेता म्हणजे शरद पवार. सामान्यांना आपलेसे करणे ही मोठी कठीण गोष्ट असते. शरद पवारांना ती लिलया जमते; कारण ते जनसामान्यांच्या प्रश्नसमस्यांना मनापासून भिडतात. लोकांच्या गरजा ओळखून प्रश्नांना उत्तरे शोधण्याच्या कामात गढून गेलेले शरद पवार त्यांच्या हरएक कृतीकार्यातून बघायला मिळतात. असाच नेता लोकांना ‘आपला’ वाटतो. कारण या नेत्याच्या शब्दांत पोकळ आश्वासन नसते तर प्रयत्नांच्या पूर्ततेची खात्री असते. कारण स्वत: शरद पवारांना जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असते तेव्हाच एकत्रित जनशक्तीची जाणीवही असते. मर्मज्ञ रसिक शरद पवार हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जाणता लोकनेता, द्रष्टा, संकटमोचक ही त्यांची प्रतिमा जनमानसात रूढ आहे.याशिवाय महाराष्ट्र आणि देशाच्या साहित्य, संस्कृती, संगीत व कलेची उत्तम जाण असलेले एक मर्मज्ञ रसिक व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद पवार! कोणत्याही गोष्टीच्या मूळापर्यंत जाण्याची सवय आपला व्यासंग वाढवते, अभ्यासाची ओढ लावते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार! अभ्यास-सायास-प्रयास या गोष्टी व्यक्तिगत जीवन घडवीत असतात. शरद पवारांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वात हे सारे कंगोरे आढळून येतात. पवारसाहेबांचे सर्वांत मोठे वेगळेपण म्हणजे ते आपला मंत्रिपदाचा अधिकार आणि ज्ञान यांची अजिबात गल्लत करीत नाहीत. आपल्याकडे सत्तापद आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यासाठी जे ज्ञान लागते ते आपल्याकडे आहेच अशा भ्रमात अनेक राजकारणी असतात. परंतु पवारसाहेब याला अपवाद आहेत. त्यांचे वाचन चौफेर आहे. ते फक्त वाचनावर थांबत नाहीत. त्यातून ‘टिपणे’ तयार करून त्यावर मनन-चिंतन करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. या अभ्यास व व्यासंगाचा त्यांना वेगवेगळ्या स्तरांवरील नागरिकांमध्ये मिसळताना फार उपयोग होतो. शास्त्रज्ञ असो वा सरकारी अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता असो वा एखादा खेळाडू वा कलावंत, व्यापारी असोत वा महिला वा आदिवासी या सर्वांमध्ये ते सहज रमतात परंतु त्यांपैकी प्रत्येकाकडून ते स्वत: काही ना काहीतरी शिकतातही. पवारसाहेबांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अनेक सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय विचारधारांचे मनोज्ञ मिश्रण आहे. साहित्य-संस्कृतीची उत्तम जाण असलेला शरद पवारांसारखा नेता दुर्मीळच म्हणावा लागेल. साहित्य हा संस्कृतीचा आरसा असतो. आपल्या संस्कृतीची ओळख आपल्याला त्यातूनच होत असते. जुन्या-नव्या साहित्याच्या वाचनाने माणूस परंपरा व आधुनिकतेशी जोडलेला राहतो. पवारसाहेबांच्या अफाट वाचनामुळेच त्यांच्या मुळातल्या सकस व्यक्तिमत्त्वाला वैचारिक सुदृढतेची जोड मिळाली आहे. संगीताच्या आस्वादामुळे त्यांच्यातील रसिकपणातला ताजेपणा मिळत राहिलेला आहे आणि या जाणत्या आणि कृतिशील रसिकामुळे साहित्य-संगीत-क्रीडा आदी क्षेत्रांच्या विकासकार्यास हातभार लागत आलेला आहे. पवारसाहेबांचे शास्त्रीय संगीताबद्दलचे प्रेम तर सर्वज्ञात आहे. या प्रेमापोटीच त्यांनी आजवर अनेक कलाकारांना राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. दिवंगत गायक पंडित भीमसेन जोशी यांच्याबद्दलचा त्यांचा आदरही सर्वांना ठाऊक आहे. पंडितजींना त्यांच्या निधनापूर्वी ‘भारतरत्न’ किताब मिळाला ही बाब आपल्या सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे.