कोंकण विभागातील दक्षिण दिण भागाचा औदयोगिक व कृषी क्षेत्रामध्ये जलद विकास साध्य व्हावा आणि विकास योजनांची अंमलबजावणी कार्यक्षमतेने व्हावी या दृटीकोनातून स्थानिक लोकांच्या मागणीचा विचार कन 1 मे 1981 रोजी रत्पागिरी जिलहयाचे विभाजन करयात येऊन रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनारपट्टीचा दक्षीणे कडील भाग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा होय. सिंधुदुर्ग जिल्हयाची निर्मिती होऊन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अस्तित्वात आली. सद्यस्थितीत एकूण 8 पंचायत समित्या व 431 ग्रामपंचायती कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान मा.श्री.आर.बी.दळवी यांना प्राप्त झाला. सन 2008 साली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयएसओ 9001:2000 मानांकित झालेली आहे.यशवंत पंचायत राज अभियान 2006-07, 2013-14, 2014-15 मध्ये राज्यस्तरावर तृतिय, सन 2017-2018 मध्ये राज्यस्तरावर द्वितीय व सन 2018-19 मध्ये राज्यस्तरावर या जिल्हा परिषदेसाठी प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण अभियान 2018 अंतर्गत राज्य स्तरावर जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.