• कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स. ९.४५ वा ते संध्या ६.१५ वा.
  • संपर्क: झरे-2 ग्रामपंचायत, दोडामार्ग

  • LOGIN
  • Register

वारसा स्थळे

हे पेज शेअर करा:

पर्यटनाच्या वाटेवरती...

समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्र राज्यातील सुबक मंदिरे, वैशिष्ट्यपूर्ण प्रार्थनास्थळे आणि भव्य किल्ल्यांचा इतिहासही तितकाच रंजक आहे. तुम्ही या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊ शकता आणि अप्रतिम वास्तुकलेचा आस्वाद घेऊ शकता.

रतनगड
Image of Ratangad
रतनगड

या किल्ल्याला गणेश, हनुमान, त्र्यंबक आणि कोकण असे चार दरवाजे आहेत. किल्ल्याचे वैशिष्ट्य असणारी प्राचीन वास्तुकलेची भव्यता पर्यटकांना थक्क करणारी आहे. तुम्ही या परिसरात असाल आणि तुम्हाला साहसी भटकंती करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या किल्ल्यावर चढून जाऊ शकता.

अदासा
Image of Adasa
अदासा

अदासा गणपती हा विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आहे. हे मंदिर 4000 वर्षे जुने असल्याचे मानले जाते. मंदिरात बाल गणेशाची सुंदर मूर्ती विराजमान आहे. एका लहानशा टेकडीवर हे मंदिर वसले असून तिथून नागपूर आणि परिसराचे विहंगम दर्शन होते.

गणपतीपुळे
Image of Ganpatipule
गणपती पुळे

गणपतीपुळे येथील गणेशमंदिर सुप्रसिद्ध असून नयनरम्य समुद्रकिनारी ते वसले आहे. मंदिराभोवती सुमारे एक किमी अंतराचा प्रदक्षिणा मार्ग असून ही प्रदक्षिणा पूर्ण करणे हा आनंददायी अनुभव आहे.

रामटेक
Image of Ramtek
रामटेक

महाकवी कालिदासाने मेघदूत या महाकाव्याची रचना या ठिकाणी केली, असे मानले जाते. एका लोककथेनुसार वनवासाच्या काळात प्रभू रामचंद्राने आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह या ठिकाणी वास्तव्य केले होते. रामटेकला भेट दिल्यानंतर तुम्ही इथून जवळ असलेल्या व्याघ्र अभयारण्यालाही भेट देऊ शकता.

पंचगंगा मंदिर
Image of Panchganga Temple
पंचगंगा मंदिर

पंचगंगा मंदिराच्या आत तुम्हाला भगवान विष्णूच्या मूर्तीचे दर्शन घेता येईल. या ठिकाणी कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा अशा पाच नद्यांचा संगम होतो आणि या नद्यांचे पाणी दगडी गोमुखातून बाहेर पडते.

दीक्षाभूमी
Image of Deekshabhoomi
दीक्षाभूमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली दीक्षाभूमीवर बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धर्माची दीक्षा दिली, त्यामुळे हे ठिकाण दीक्षाभूमी म्हणून ओळखले जाते. जगभरातील बौद्ध धर्मीय आणि पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात.

विजयदुर्ग
Image of Vijaydurg
विजयदुर्ग

विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभेद्य असा जलदुर्ग आहे. उत्कृष्ट वास्तुकलेचा नमूना असणारा हा दुर्ग आजही सुस्थितीत उभा आहे. अजिंक्य दुर्ग असणारा विजयदुर्ग पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणूनही ओळखला जात असे.

इस्कॉन
Image of Wai
इस्कॉन

भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी १९६६ साली इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेस - इस्कॉनची स्थापना केली. खारघर येथे आठ एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेले हे इस्कॉन मंदिर सांस्कृतिक आणि वैदिक शिक्षणाचेही केंद्र आहे.

शिवनेरी
Image of Shivneri
शिवनेरी

शिवनेरी किल्ला हे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर असून जिजाऊ आणि बाल शिवबाच्या प्रतिमाही तुम्ही पाहू शकता.

एलिफंटा लेणी
Image of Elephanta Caves
एलिफंटा लेणी

एलिफंटा किंवा घारापुरी हे दक्षिण मुंबईतील एक बेट आहे. अखंड पाषाणात साकारलेली अद्भूत लेणी हे या ठिकाणाचे वैशिष्ट्य आहे. या बेटावरच्या डोंगरात पाच विशाल लेणी खोदलेली दिसतात.

लोणार सरोवर
Image of Lonar Crater
लोणार सरोवर

सुमारे ५७००० वर्षांपूर्वी उल्केच्या आघातामुळे या खाऱ्या पाण्याच्या सरोवराची निर्मिती झाली. एका पौराणिक कथेनुसार या ठिकाणी लवणासूर नावाच्या राक्षसाचा वध श्रीविष्णुंनी केला आणि त्यावरून या ठिकाणाला लोणार असे नाव प्राप्त झाले.

अंबरनाथ
Image of Ambarnath
अंबरनाथ

अमरनाथ या शिवशंकराच्या नावावरून ठाणे जिल्ह्यातील या शिवमंदिराला अंबरनाथ हे नाव मिळाले असावे. महाशिवरात्रीसारख्या दिवशी असंख्य भाविक या मंदिराला आवर्जून भेट देतात. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमूना असणारे हे शिवमंदिर पर्यटकांना एक वेगळा आनंद आणि समाधान देणारे आहे.

त्र्यंबकेश्वर
Image of Trimbakeshwar
त्र्यंबकेश्वर

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान आहे. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमूना असणाऱ्या या मंदिराला भेट देणे, ही पर्यटकांसाठी खचितच पर्वणी आहे.

प्रतापगड
Image of Pratapgad
प्रतापगड

प्रतापगड म्हणजे शौर्याचे प्रतिक असणारा गड. शिवरायांच्या स्वराज्यातील हा महत्वाचा गड आजही इतिहासप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. वेगवेगळ्या वयोगटातील इतिहासाचे विद्यार्थी आणि अभ्यासक हजारोंच्या संख्येने प्रतापगडाला आवर्जून भेट देतात.

टिटवाळा गणेश मंदिर
Image of Titwala Ganesh Temple
टिटवाळा गणेश मंदिर

या प्राचीन मंदिराला भेट देणे हा सकारात्मक उर्जा देणारा अनुभव आहे.. अखंड दगडात कोरलेली गणेशमूर्ती या मंदिरात विराजमान आहे. मूर्तीबरोबरच मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना, भाविकांबरोबरच पर्यटकांच्याही आकर्षणाचे केंद्र ठरते

हरीहरेश्वर
Image of Harihareshwar
हरीहरेश्वर

रायगड जिल्ह्यातील हरीहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरीहरेश्वराचे हे मंदिर दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरीहरेश्वर अशा तिन्ही समुद्रकिनाऱ्यापासून जवळ आहे. एका बाजुला गर्द वनराई आणि दुसरीकडे नीळाशार अथांग समुद्र, अशी आकर्षणे पर्यंटकांना या ठिकाणाची भुरळ घालतात.

नटराज मंदिर
Image of Natraja Mandir
नटराज मंदिर

या मंदिरातील दाक्षिणात्य शैलीची वास्तुकला अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. मंदिरातली प्रसन्न शांतता आणि सकारात्मकता अनुभवण्यासाठी पर्यटकांनी या ठिकाणाला अवश्य भेट द्यावी.

श्री साईबाबा मंदीर
Image of Natraja Mandir
श्री साईबाबा मंदीर

१९१७-१८ साली स्थापना झालेले श्री साईबाबा मंदिर हे शिर्डीचे मुख्य आकर्षण आहे. याच ठिकाणी साईबाबांनी समाधी घेतली. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर साईबाबांच्या जीवनाची झलक सांगणारा,  चित्र आणि कलाकृतींचा एक विशेष संग्रह पाहता येतो.

सिंहगड
Image of Sinhagad
सिंहगड

पुणे दरवाजा किंवा कल्याण दरवाजा अशा दोन प्रवेशद्वारांमधून तुम्ही सिंहगडावर प्रवेश करू शकता. महाराष्ट्राच्या इतिहासात या किल्ल्याची भूमिका महत्वाची आहे.

भीमाशंकर
Image of Bhimashankar
भीमाशंकर

घनदाट जंगलात वसलेले भीमाशंकर हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान असून पुणे शहरापासून ते सुमारे १२५ किमी अंतरावर आहे. या क्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केल्यानंतर एकूणच या ठिकाणची लोकप्रियता वाढली आहे.

अजिंठा
Image of Ajanta Caves
अजिंठा

भारतातील शिल्पकला आणि बौद्ध संस्कृतीचा महत्त्वपूर्ण इतिहास सांगणारी ही लेणी जगद्विख्यात आहेत. युनेस्कोने १९८३ साली ह्या लेण्यांना जागतिक वारसा म्हणून घोषित केले.

सेवाग्राम
Image of Sevagram
सेवाग्राम

वर्ध्याजवळ एका लहानशा गावात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा हा प्रसिद्ध सेवाग्राम आहे. १९३६ साली आपल्या पत्नी कस्तुरबा यांच्यासह गांधीजी इथे वास्तव्यासाठी आले होते.

स्वामीनारायण मंदिर
Image of Swaminarayan Temple
स्वामीनारायण मंदिर

अक्षरधाम मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराला दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. हे दोन मजली मंदीर दिवेलागणी नंतर वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशात न्हाऊन निघते आणि ते दृश्य अतिशय विलोभनीय दिसते. 

वेळणेश्वर
Image of Velneshwar
वेळणेश्वर

वेळणेश्वर या लहानशा गावात हे वेळणेश्वर मंदीर आहे. समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ असणाऱ्या या मंदिरात सायंकाळी दिव्यांची आरास केली जाते, या रोषणाईच्या प्रकाशात मंदिराची वास्तू अतिशय आकर्षक दिसते.

स्वामित्व हक्क © , www.yuvaface.com 

Go To Top