महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग म.रा.बालहक्क संरक्षण आयोग

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची जुलै २००७ मध्ये स्वायत्त मंडळ म्हणून बाल हक्क संरक्षण कायदा २००५ (२००६ मधील ४) अन्वये राज्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे. सी आर सी म्हणजेच बालहक्क परिषदेत निर्देषित मानांकना बरहुकूम वर्तणूकीकरिता आयोग विविध उपक्रम राबवितो. यामध्ये खाली दिलेल्या काही प्रमाण मानांकनांचा समावेश होतो:

  1. बालकांना सर्व प्रकारच्या जातीपाती, रंग, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मते, राष्ट्रीय पंरपरा किंवा सामजिक मुळ, संपत्ती, व्यंग किंवा इतर दर्जा याच्या भेदभावा पासून संरक्षण आहे.
  2. बालकांसंदर्भातील कृती मध्ये, बालकाच्या सर्वोत्तम हिताला सर्वाधिक प्राथमिकता दिली जाईल.
  3. बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे.

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी, पुढील संकेतस्थळाला भेट द्या http://egov.co.in/ PDF File